मुंबई- प्रभादेवी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे मच्छी मार्केटला अस्वच्छतेने विळखा घातला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रार दाखल करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
प्रभादेवी येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे मच्छी मार्केटला अस्वच्छतेचा विळखा - मच्छी मार्केटला अस्वच्छतेचा विळखा
सकाळी लोकांची वर्दळ वाढल्यावर प्रभादेवी येथील मच्छी बाजारामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. वाहतूक कोंडी, ट्रक पार्किंग होत असल्याने अनेक दुर्घटना होत असतात. थरमोकॉल, भुसा रस्त्यावर विखुरलेल्या असतो. गटारे चोकअप होतात, डेंग्यू, मलेरिया होण्याचा धोका निर्माण होत असून दुर्गंधीही पसरते. येथील रहिवाश्यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

सेनापती बापट मार्ग दादर येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे मच्छी बाजार गेले १८ वर्ष येथे आहे. आंध्रप्रदेश येथून रोज रात्री १०-१२ मोठे ट्रक भरून मच्छी येथे येते. पहाटे ४ वाजता हा बाजार सुरू होऊन दुपारी १ वाजेपर्यंत सुरू असतो. सकाळी लोकांची वर्दळ वाढल्यावर या मच्छी बाजारामुळे येथे अनेक अडचणी निर्माण होतात. वाहतूक कोंडी, ट्रक पार्किंग होत असल्याने अनेक दुर्घटना होत असतात. थरमोकॉल, भुसा रस्त्यावर विखुरलेल्या असतो. गटारे चोकअप होतात, डेंग्यू, मलेरिया होण्याचा धोका निर्माण होत असून दुर्गंधीही पसरते. येथील रहिवाश्यांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.
मच्छी मार्केटच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या बाबत तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी, नगरसेवक याकडे काना डोळा करतात. येथील परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांनी मार्केट दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी केली आहे. भविष्यात हा प्रश्न कधी सोडवला जाईल हे सांगता येणार नाही परंतु, लोकांचे जीव या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नक्की जाणार हे निश्चित असून त्यानंतर प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल रहिवाश्यांनी केला आहे.