मुंबई - आजपासून बुधवार (दि. 2 मार्चपासून) मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. तब्बल दोन वर्षांनी पूर्व प्राथमिक ते बारावीच्या मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. (Special instructions of Education) कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.(BMC Schools Started) आजपासून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ आणि पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. (Schools reopen with full capacity) यासंदर्भातील परिपत्रक काही दिवसांपूर्वी बीएमसीकडून जारी करण्यात आले आहे.
पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी
सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमांच्या नगरबाह्य विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Covid schedule) पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात याव्यात असे परिपत्रकात पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शाळांना मधली सुट्टी असेल
विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल. (Special instructions of Education) परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असही परिपत्रकात म्हटले आहे.
विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत
पालिकेने परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100% असणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार, शाळांच्या नियमित वर्गाच्या तासांमध्ये मैदानी खेळ शालेय कवायती, तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे असही यामध्ये म्हटले आहे.
शिक्षण विभागाच्या विशेष सुचना
- 1. कोरोनाची (Corona) पार्श्वभूमी विचारात घेऊन मनपा आयुक्त यांच्या मंजुरीने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या शाळा बंद अथवा सुरु करण्याबाबत यापूर्वी निर्गमीत करण्यात आलेली सर्व कोविड 19 आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे.
- 2. 2 मार्च 2022 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या व नगरबाहय विभागाच्या पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने 'ऑफलाईन' पद्धतीने सुरु कराव्यात.
- 3. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळासुद्धा ऑफलाईन पद्धतीने पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने सुरु करण्यात याव्यात.
- 4. विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी.
- 5. शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांची उपस्थिती 100 टक्के असणे आवश्यक आहे.
- 6. शिक्षक - शिक्षकेतर कर्मचा-यांचे 100 टक्के लसीकरण करावे.
- 7. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या तासामध्ये मैदानी खेळ, शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत व या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.
- 8. वर्गाध्यापन, स्कूलबस / स्कूलव्हॅन मध्ये व शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारिरीक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल.
हेही वाचा -Tope Comment On Bhide : संभाजी भिडे यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही -राजेश टोपे