महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Schools Reopen Mumbai :...म्हणून मुंबईतील शाळा २७ जानेवारीपासून सुरु होणार - सुरेश काकाणी

२४ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरु ( School Will Start From January 24 ) करण्याचा निर्णय राज्य सरकारने ( State Government ) घेतला आहे. मात्र मुंबईमधील शाळा २७ जानेवारीपासून ( Schools In Mumbai Will Start From January 27 ) सुरु केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली आहे.

सुरेश काकाणी
सुरेश काकाणी

By

Published : Jan 20, 2022, 7:18 PM IST

Updated : Jan 20, 2022, 7:27 PM IST

मुंबई -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या ( Corona Third Wave ) पार्श्वभूमीवर १५ जानेवारीपासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार आटोक्यात असल्याने सोमवार २४ जानेवारीपासून राज्यातील शाळा सुरु ( School Will Start From January 24 ) करण्याचा निर्णय राज्य सरकारने ( State Government ) घेतला आहे. मात्र मुंबईमधील शाळा २७ जानेवारीपासून ( Schools In Mumbai Will Start From January 27 ) सुरु केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी ( Municipal Corporation Additional Commissioner Suresh Kakani ) यांनी दिली आहे. शिवाय ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने शिक्षण दिले जाणार असल्याचेही काकाणी म्हणाले. तसेच कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने मुंबईमधील वेळेचे बंधन कमी केले जाईल, मात्र क्षमतेचे बंधन आणखी काही वेळ असेच राहील, असेही काकाणी यांनी सांगितले.

महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी माहिती देतांना
  • मुंबईतील शाळा पुन्हा सुरु होणार

राज्य सरकारने येत्या सोमवार २४ जानेवारीपासून शाळा सुरु करून असे जाहीर केले आहे. तसेच शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडला आहे. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी बोलत होते. यावेळी बोलताना मुंबईमधील शाळा सुरु कारण्यापूर्वी शाळांमध्ये स्वच्छता कारवी लागणार आहे. शाळांमध्ये सॅनिटाइझेशन करावे लागणार आहे. यासाठी काही कालावधी लागणार असल्याने २७ जानेवारीपासून शाळा सुरु केल्या जातील. सर्व वर्गाच्या शाळा सुरु करण्यासाठी पालिका सकारात्मक आहे. राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळा सुरु होतील. ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवयाचे आहे. त्यांना ऑफलाईन तर ज्या पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे नाही त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यास आमच्याकडे ८० टक्के बेड रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार केले जातील असे काकाणी यांनी सांगितले.

  • वेळेचे निर्बंध शिथिल होणार!

कोरोनाच्या प्रसारामुळे मुंबईमध्ये रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. तर सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी आहे. मैदाने, उद्याने बंद आहेत. लग्न, जिम, सलून, सरकारी खासगी कार्यालये आदी ठिकाणी ५० टक्के उपस्थिती आहे. हॉटेल रेस्टोरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने उद्याने आणि मैदाने सकाळी आणि संध्याकाळी वॉक घेणाऱ्या नागरिकांसाठी सुरु ठेवण्याचा तसेच हॉटेल रेस्टोरंट यांना रात्रीची १० वाजताची वेळ वाढवून देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

  • राज्य सरकारकडून शाळा सुरु करण्याचा निर्णय

राज्यातील शाळा येत्या २४ जानेवारी सोमवारपासून सुरू होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मुंबईत त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने व कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील शाळा पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरत असल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा बैठक घेऊन एकंदरीत फाईल काल मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवली होती. त्यामध्ये शाळा सोमवारी सुरू करा, अशी आम्ही विनंती केली होती. ती विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. येत्या सोमवारपासून संपूर्ण राज्यात प्राथमिक वर्गासह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • स्थानिक प्रशासनाला अधिकार

ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. त्याठिकाणी नियमांचे पालन करून शाळा सुरू होतील. जिथे रुग्ण संख्या जास्त असेल तिथे स्थानिक प्रशासनाला आम्ही शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. काळजी घेऊनच शाळा सुरू कराव्या अशी मी विनंती करत आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आमच्या नियमावलीत दोन गोष्टी टाकत आहोत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन डोस घेतलेले असावेत. तसेच शाळेत जाऊन लसीकरण करता येईल का हे आम्ही पाहत आहोत. त्याचबरोबर 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेतच करावे अशी सुद्धा आमची मागणी आहे, असेही गायकवाड म्हणाल्या.

हेही वाचा -सोमवारपासून सुरू होणार राज्यातील शाळा - वर्षा गायकवाड

Last Updated : Jan 20, 2022, 7:27 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details