मुंबई - मुख्य शहर, उपनगर तसेच ठाणे व कोकण भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, पुढील दोन दिवस ठाणे व कोकण भागात देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.
मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर; हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा - अतिवृष्टीचा इशारा
मुंबई, उपनगर तसेच ठाणे व कोकण भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, उपनगर तसेच ठाणे व कोकण भागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालयांना गुरुवार (दि.19 सप्टेंबर)ला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी या निर्णयासंदर्भात ट्विट केले आहे. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमधील परिस्थीतीनुसार जिल्हाधिकाऱयांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
Last Updated : Sep 19, 2019, 3:26 AM IST