मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नाही. फक्त शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होत्या. आता कोरोना नियंत्रणात आल्याने शाळा सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे यंदा राज्यातल्या शाळांतील पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग एप्रिलमध्येही पूर्णवेळ सुरू ठेवण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
शनिवारी पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक-
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून शाळा बंद ठेऊन ऑनलाईन शिक्षण सुरू ( online education in corona crisis ) होते. आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना, कार्यक्रमांवरील कोरोना विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्यात ( restrictions in pandemic ) येत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्वसाधारणपणे दरवर्षी मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरण्यास परवानगी ( reopen Schools in March 2022 ) दिली जाते. या शैक्षणिक वर्षात एप्रिल महिन्यांत इयत्ता पहिली ते नववी व अकरावीची शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहावे लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार पूर्णवेळ व रविवारी ऐच्छिक स्वरुपात मुलांना शाळेत हजर राहावे लागणार आहे.
हेही वाचा-Alcohol Abhisheka For God : चक्क देवाला चढवला जातो दारु अन् सिगारेटचा नैवैद्य; पाहा, व्हिडिओ...