मुंबई-राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या परीक्षा चालू आहेत. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे आवश्यक आहे. वीज जोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी ( School electricity bills exhausted ) 14 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे शालेय शिक्षण विभागाकडून जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू कराव्यात ( Restore School Electricity ) असे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी सांगितले.
काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री-शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सध्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय शिक्षण विभागाने वीजजोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी 13 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे आज भरण्यात येत आहेत. त्यामुळे महावितरणने आज सर्व वीज जोडण्या सुरू करण्यात. वीज दराबाबत वीज नियामक आयोगाने शाळांसाठी जी वर्गवारी केली आहे. त्याच वर्गवारी मधील वीज जोडण्या आहे किंवा नाही याची तपासणी करून घेण्याबाबत महावितरणच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी खात्री करून घ्यावी. अन्यथा तसा बदल करून शाळांना वीज देयक द्यावेत.
Varsha Gaikwad : शाळांच्या तोडलेल्या वीज जोडण्या पुन्हा सुरू कराव्यात - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
राज्यातील शाळांचे वीजबिल थकल्याने ( School electricity bills exhausted ) अनेक शाळांची वीज तोडण्यात आली होती. ही थकबाकी भरली असल्याने तातडीने वीजजोडणी ( Restore School Electricity ) करावी, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Minister Varsha Gaikwad ) यांनी महावितरणला दिले.
6682 शाळांची वीज जोडणी तोडली-राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 60 हजार 801 शाळा असून, 56 हजार 235 शाळांमध्ये वीज जोडणी आहे. तर वीज जोडणी नसलेल्या शाळांची संख्या 4 हजार 566 आहे. 6 हजार 682 शाळांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली असून, 14 हजार 148 शाळांची जोडणी कायमस्वरूपी तोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा : यंदा पाहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभाग राबविणार 'स्टार' उपक्रम