महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टच्या 900 ई बसेसच्या 3600 कोटींच्या कंत्राटात घोटाळा; भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचा आरोप - बेस्टच्या ई बसमध्ये घोटाळा

बेस्टने 900 ई बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की काँसेस  मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा प्रश्न भाजप आमदार मिहिर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांना विचारला आहे.

BJP MLA Mihir Kotecha
भाजप आमदार मिहिर कोटेचा

By

Published : Feb 18, 2022, 5:34 PM IST

Updated : Feb 18, 2022, 7:47 PM IST

मुंबई -बेस्टने 900 ई बसेस विद्युत गतीने खरेदी करण्याचा डाव हा मुंबईकरांसाठी आहे की काँसेस मोबेलिटी या कंपनीच्या भल्यासाठी? असा प्रश्न भाजप आमदार मिहिर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांना विचारला आहे. या 900 ई बसेसच्या कंत्राटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला. भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजप आमदार मिहिर कोटेचा

केंद्र सरकारच्या पैशांचा दुरुपयोग -

केंद्र सरकारने राष्ट्रीय शुद्ध हवा वायू अभियानासाठी 3600 कोटींचा निधी मुंबईकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी दिला. पण काही विशिष्ट ठेकेदारांच्या भल्यासाठी त्यावर डल्ला मारण्याचे काम केले जात आहे असा आरोप भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी केला आहे. विशेषता निविदा ही फक्त 200 ई बसेस गाड्यांची निघाल्यानंतर 400 केली गेली व त्यानंतर त्याला कुठलीही मंजुरी भेटेपर्यंत पुनर्निविदा न काढता ही संख्या 900 कशी केली गेली? असा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला.

निविदा 200 बसेसची, झाल्या 900 -

मागच्या डिसेंबरमध्ये 200 दुमजली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याची निविदा बेस्टकढून काढण्यात आली होती. मात्र, प्रस्ताव मंजूर करताना 200 च्या 900 बसेस करून एकंदरीत 3600 कोटींचे कंत्राट आणि त्यापैकी एक विशिष्ट कंपनी काँसेस, मोबिलिटी यांच्या खिशात 700 बसची पुन्हा पुनर्निविदा न काढता 2800 कोटींचे कंत्राट घालण्याचे कारस्थान सत्ताधारी पक्षाने केलेले आहे, असा आरोपही कोटेचा यांनी केला आहे.

पूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवर्‍यात -

काँसेस मोबिलिटी या कंपनीचे भागभांडवल फक्त 1 लाख रुपये असताना व जी कंपनी मागच्या जून महिन्यामध्ये निर्माण झाली आहे, अशा कंपनीला 700 बसेसचे कॉन्ट्रॅक्ट कुठल्या आधारे देण्यात आले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे 200 बसेस आहेत याचे कंत्राट अशोक लेलँड या नामांकित कंपनीला दिले गेले आहे. त्या कंपनीने स्वतःहुन सांगितले की ते 200 बसच्या वरती जास्त बसेस देऊ शकत नाही. मग या कंपनीला एका झटक्यात 700 बसेसचे कंत्राट देण्यात आले, असा संशयही यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या प्रकरणावर एकंदरीत आवाज उठवून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न लावून धरण्याचे सांगत गरज पडली तर न्यायालयात सुद्धा या प्रकरणात दाद मागणार असल्याचे मिहिर कोटेचा यांनी सांगितले आहे.

Last Updated : Feb 18, 2022, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details