मुंबई :मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 रोजी संपला आहे. पालिकेची निवडणूक कधी होणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच प्रभागांच्या संख्येवरून सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने महापालिकेच्या निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आज कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागानुसार की 236 प्रभागानुसार घ्यायच्या, याबाबत कोर्ट निर्णय देण्याची शक्यता (SC Decision Election of Municipal Corporation) आहे. यामुळे आजच्या निकालानंतर पालिकेच्या निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होणार (Election of Mumbai Municipal Corporation) आहे.
BMC : मुंबई महापालिकेची निवडणूक 'कोणत्या' प्रभागानुसार होणार, आज न्यायालयात निर्णय - मुंबई महापालिकेची निवडणूक न्यायालयात निर्णय
आज कोर्टामध्ये सुनावणी असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका 227 प्रभागानुसार की 236 प्रभागानुसार घ्यायच्या, याबाबत कोर्ट निर्णय देण्याची शक्यता (SC Decision Election of Municipal Corporation) आहे. यामुळे आजच्या निकालानंतर पालिकेच्या निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होणार (Election of Mumbai Municipal Corporation) आहे.
वाद सर्वोच्च न्यायालयात -मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ मार्च २०२२ ला संपला आहे. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी- मार्चमध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनाच्या कारणाने ही निवडणूक वेळेवर होऊ शकली नाही. महापालिकेचा कार्यकाळ संपल्याने राज्य सरकारकडून पालिकेवरती प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने पालिकेच्या प्रभागांची संख्या 227 वरून 236 केली होती. मात्र राज्यात सत्तांतर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारने प्रभाग संख्या 227 केली आहे. राज्य सरकारने घेतलेला 227 प्रभागांचा निर्णय रद्द करावा, यासाठी मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) माजी उपमहापौर सुहास वाडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष -मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांची संख्या 236 असावी ही 227 असावी. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका संपन्न होणार आहेत. यामुळे पालिका निवडणूक 227 प्रभागानुसार की 236 प्रभागानुसार होणार, याबाबत कोर्ट काय निर्णय देतं ? याकडे आता राजकीय पक्ष आणि मुंबईकरांचे लक्ष लागले (Municipal Corporation Election) आहे.