Nawab Malik Case : मलिकांच्या याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची सहमती
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच मलिक यांच्या जामीनाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केल्यानंतर उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. मलिक यांनी मनी लॉड्रींग प्रकरणातून मुक्त करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका देखील फेटाळण्यात आली.
मुंबई -तुरूंगात असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या याचिकेच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लवकरच मलिक यांच्या जामीनाची सुनावणी होण्याची शक्यता आहे. ईडीने अटक केल्यानंतर उच्च न्यायालयाने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. मलिक यांनी मनी लॉड्रींग प्रकरणातून मुक्त करण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका देखील फेटाळण्यात आली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आता सर्वोच्च न्यायालयाने याचिका सुनावणीस सहमती दिल्याने काही प्रमाणात मलिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.