मुंबई : निवडणूक आयोगाने ( Election Commission ) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ( Election symbol of Shiv Sena frozen ) पुढील रणनीति ठरवण्यासाठी बोलावलेल्या शिंदे गटाच्या ( Shinde group ) बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि कृषी मंत्र्यांमध्ये शाब्दिक राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री सत्तारांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केली. मुख्यमंत्र्यांचा राग यामुळे अनावर झाला आणि दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. शेवटी बैठकीला न थांबता सत्तारांनी काढता पाय घेतल्याचे समजते.
Shinde Group meeting : शिंदे गटाच्या बैठकीत सत्तारांचा राडा; शिवीगाळ केल्याने मुख्यमंत्र्यांनी हाकलले - Sattar crises in Shinde Group Meeting
निवडणूक आयोगाने ( Election Commission ) शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर ( Election symbol of Shiv Sena frozen ) पुढील रणनीति ठरवण्यासाठी बोलावलेल्या शिंदे गटाच्या ( Shinde group ) बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि कृषी मंत्र्यांमध्ये शाब्दिक राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
रणनीती ठरवण्यासाठी शिंदेंनी बोलावली बैठक : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत. पक्षात झालेल्या मोठ्या फुटीमुळे शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या चिन्हावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. दोघांनाही नवे चिन्ह आणि पक्षाच्या नावाचे तीन पर्याय सुचवण्यास सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची यासंदर्भात दुपारी बैठक झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रणनीती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. शिंदे गटाचे खासदार, आमदार, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
संतप्त झालेले सत्तार वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडून निघाले : शिंदे गटाकडून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असतानाच मंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांवर भडकले आणि त्यांना शिविगाळ केली. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. मात्र, सत्तार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सत्तरांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये जोरदार जुंपली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडून निघाले. शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीमुळे आधीच सरकारबद्दल नाराजी आहे. त्यातच सत्तार यांच्या शिवीगाळ प्रकरणाची भर पडली आहे. भाजप नेत्यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.