मुंबई-निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेसोबत 100 कोटी रुपये वसुलीबाबत ( 100 crore extortion case ) कोणतीही चर्चा झाली नाही. मी कधीही त्याला अनिल देशमुख यांच्यावतीने पैसे गोळा करायला सांगितले नव्हती, अशी माहिती अनिल देशमुख यांचे खासगी सचिव ( Anil Deshmukhs PS in Chandiwal commission ) संजीव पालांडे यांनी आज सोमवार (दि.10) रोजी झालेल्या चांदीवाल आयोगासमोर माहिती दिली आहे.
100 कोटी कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून चांदीवाल आयोगाची स्थापना ( Chandiwal commission probe about Anil Deshmukh ) करण्यात आली आहे. या आयोगासमोर पीएस संजीव पालांडे यांची उलटतपासणी करण्यात आली आहे. ही तपासणी सचिन वाझे यांच्या वकिलाकडून आज आयोगासमोर करण्यात आली. त्यावेळी संजीव पालांडे ( Sanjeev Palande in Chandiwal commission ) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
हेही वाचा-Anil Deshmukh : देशमुखांच्या मालमत्ता जप्ती याचिकेवर 19 जानेवारीपर्यंत कारवाई करु नये - मुंबई उच्च न्यायालय
काय म्हणाले संजीव पालांडे?
आपणअनिल देशमुखयांचे पीएस म्हणून तात्काळ 7 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो होतो. फेब्रुवारी 2021 मध्ये गृहमंत्री आजारी पडले होते. या काळात पैसे घेण्याबाबत किंवा देण्याबाबत काही बोलणे झाले नाही. कोणत्याही प्रकारे पैसे घेण्याबाबत त्यांनी आदेश दिले नव्हते, असे आयोगाला उलटतपासणीत सांगितले आहे. आयोगाचे कामकाज उलट तपासणीनंतर संपले आहे. त्यानंतर आयोगाचे कामकाज 12 जानेवारीपर्यंत दुपारी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेले आहे.