मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांना पत्र लिहून राज्यातील शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर 'ईडी' सांरख्या संस्थेचा वापर करून राजकीय सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
पत्रात काय म्हणाले संजय राऊत -
गेली 25 वर्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची युती होती. परंतु वैचारिक मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो. आज शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्तेत आहे. मात्र, जेंव्हापासून शिवसेना आणि भाजपाची युती तुटली तेंव्हापासून 'ईडी' सारख्या संस्थेचा वापर करून शिवसेना नेत्यांसह त्यांच्या नातेवाईक, मित्र आणि जवळच्या लोकांना लक्ष करण्यात येत आहेत. त्यांना कारवाईची धमकी देण्यात येत आहे. तसेच काहींना कथीत मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये अटकही करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा हा गुप्त हेतू असल्याचेही त्यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा -पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसून धाधांत खोटे बोलणारे नरेंद्र मोदी हे देशातील व जगातील पाहिले पंतप्रधान - भाई जगताप