महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dasara Melava Issue तर मैदानात घुसून दसरा मेळावा घेऊ; संजय राऊतांचा इशारा...

शिवसेना नेते संजय राऊतांनी दसरा मेळावा शिवाजी Sanjay Raut warning to administration dasara melava पार्कवर करणं आमची परंपरा (dasara melava shivaji park) आहे. जर परवानगी नाही दिली तर आतमध्ये घुसून मेळावा घेऊ, असा इशारा (Sanjay Raut warning to administration) दिला आहे. आज सत्र न्यायालयात हजर झाल्यानंतर कोर्टाबाहेर ते पत्रकारांशी बोलत होते.Dasara Melava Issue

Dasara Melava Issue
संजय राऊतांचा इशारा

By

Published : Sep 19, 2022, 2:55 PM IST

Updated : Sep 19, 2022, 3:59 PM IST

मुंबई -शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेली परंपरा (dasara melava shivaji park) आहे. जर यावर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली नाही. तरीसुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, तसेच वेळ पडल्यास शिवाजी पार्कवर घुसून दसरा मेळावा साजरा (Sanjay Raut warning to administration) करण्यात येणार, असे शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज सत्र न्यायालयात हजर झाल्यानंतर कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.Dasara Melava Issue




दसरा मेळावा शिवतीर्थावरचं : शिवसेनेतून बंड करून बाहेर पडलेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील यावर्षी शिवतीर्थावर मेळावा घेण्याचे जाहीर केले. मात्र मुंबई महानगरपालिके तर्फे अद्यापही कोणत्याही गटाला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा निमित्त कोणाचा आवाज ऐकायला येणार? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत असताना, शिवसेनेची बुलंद आवाज आणि बुलंद तोफ समजले जाणारे संजय राऊत यांनी शिवसेनेचा दसरा मेळावा कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच होणार असे म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शिवतीर्थावरच दसरा मेळावा होणार असे म्हटले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी दसरा मेळावा शेवटी आता शिवतीर्थावरच होणार या मतावर शिवसेना आता ठाम असल्यास देखील त्यांनी सांगितलं आहे. याच प्रकरणात आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.




शिंदे गटाचा अर्ज पालिकेने स्विकारला : गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा मुद्दा ताणला जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा यासाठी शिवसेनेसह शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र महापालिकेने अद्याप शिवाजी पार्क मैदानाबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे बीकेसीमधल्या दोन मैदानांसाठी दोन्ही गटांनी अर्ज केले होते. त्यातल्या शिंदे गटाचा अर्ज पालिकेने स्विकारला असून ठाकरेंचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या गोंधळात आणखी भर पडली म्हटल्यास वावगं ठरणार नाही.



दसरा मेळावा कोर्टात जाणार? : मात्र हा गोंधळ आता आणखी वाढला तर, शिवसेना शिवाजी पार्कसाठी थेट न्यायालयाची पायरी चढणार आहे. त्यामुळे आता दसरा मेळावा थेट कोर्टात जाणार असल्याची चर्चा आहे. दसरा मेळावा आपण फक्त आणि फक्त शिवतीर्थावरच घेणार अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आता महापालिकेने जर शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान नाकारलं, तर मात्र शिवसेना थेट कोर्टात जाणार आहे. महापालिकेने जर प्रकरण ताणलं, तर थेट मैदानात जाऊन मेळावा घेण्याची तयारीही शिवसेनेने दाखवली आहे.Dasara Melava Issue

Last Updated : Sep 19, 2022, 3:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details