मुंबई - ईडीने नोटीस पाठविल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. बंडखोर आमदार म्हणजे जिवंत प्रेत असल्याचे सूचक ट्विट संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांना ईडीने नोटीस दिली आहे. आज ते ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे. जहालत एक किस्म की मौत है, और जहिल लोक चलती फिरती लाश है...
संजय राऊत यांनी काय केली होती टीका-गेली दोन दिवस संजय राऊत या प्रकारचे विधान करत आहेत. सोमवारी संजय राऊत म्हणाले होते, मी काय बोललो, त्यांचा आत्मा मेलेला आहे. फक्त ते जिवंत आहेत आणि ते खरं आहे. माझ्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला. जिवंत प्रेत हा मराठीतला एक शब्दप्रयोग आहे, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी वादग्रस्त विधानावर ( Sanjay Raut clarification on statement ) स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत यांना ईडीने चौकशीसाठी समन्स ( ED summons Sanjay Raut ) बजावले आहे. 28 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स संजय राऊत यांना ईडीकडून पाठवण्यात आले आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीचे हे समन्स ( Sanjay Raut in Land corruption ) आले आहे.
ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया- संजय राऊत म्हणाले होते, की, मला आत्ताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहेत. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी... हे कारस्थान सुरु आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या... मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट करत राऊतांनी उत्तर दिले.