मुंबई :शेतकरी कायदा रद्द व्हावा यासाठी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. मात्र या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या पंजाब, हरयाणातील या भागातील शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणून देणं हे दुर्देवी आहे, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्याप्रकारे दिल्लीत येण्यापासून रोखण्यात येत आहे, यावरुन असं दिसत आहे की हे देशातील नाही तर बाहेरचे शेतकरी आहेत. त्यांना देण्यात येणारी वागणूक ही दहशतवाद्यांसारखी आहे, असे राऊत म्हणाले.