महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on Sharad Pawar : 'राजद्रोहा कायद्याबाबत शरद पवार यांची भूमिका राष्ट्रव्यापी आहे'

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य (Rana Couple in Jail) तुरुंगात आहे. या राजद्रोहाच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे म्हटलं होतं. यावर संजय राऊत यांनी 'राजद्रोहा कायद्याबाबतची शरद पवार यांची भूमिका राष्ट्रव्यापी' असल्याचे म्हटले आहे.

sanjay raut
sanjay raut

By

Published : Apr 29, 2022, 1:27 PM IST

मुंबई : जातीय तेढ निर्माण केल्याच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे दाम्पत्य (Rana Couple in Jail) तुरुंगात आहे. या राजद्रोहाच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कायद्याचा गैरवापर होत असल्याचे म्हटलं होतं. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली असून 'राजद्रोहा कायद्याबाबतची शरद पवार यांची भूमिका राष्ट्रव्यापी' असल्याचे म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

संजय राऊत वक्तव्य
यावर वाद नको
यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "शरद पवार यांची जी भूमिका आहे ती राष्ट्रव्यापी आहे. या देशात ज्याप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, त्याच प्रकारे देशद्रोही 124a या कलमाचा देखील गैरवापर होतो आहे. अगदी दिल्लीपासून जे एन यु पासून उत्तर प्रदेश सरकार आसाम आणि महाराष्ट्रात भीमा कोरेगाव दंगली नंतर ज्या लोकांवर हा गुन्हा दाखल झाला. त्या संदर्भात देखील देशात चर्चा सुरू आहे. आता प्रश्न राहिला एका दाम्पत्याचा. ज्या दाम्पत्याने महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करून दंगली भडकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात कारस्थान केले होते. त्याला एका राजकीय पक्षाचे पाठबळ होते. आणि हे करण्यासाठी अंडरवर्ल्डचा परदेशातील संस्थांचा किंवा अतिरेकी संघटनांचा काही हात आहे का ? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जी कलमे लावली आहेत यावरती वाद होऊ नये."

हेही वाचा -ED Summons to Bhavna Gawali : खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पुन्हा समन्स; 5 मे रोजी हजर राहण्याचे निर्देश

हा एक संशोधनाचा विषय
"उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे जे काही पालन करायचे आहे ते करण्यात आलेले आहे. अशा प्रकारच्या आदेशाचे पालन महाराष्ट्रात करावे ही सरकारची भूमिका आहे. मला वाटत महाराष्ट्र सरकार नेहमी कोर्टाच्या आदेशाचे पालन करत. आता योगी कोण आणि भोगी कोण, या संदर्भात मत परिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने करावी.' असेही राऊत यांनी म्हटले आहे.

त्याचेच प्रतिबिंब आज अग्रलेखात
"पंतप्रधानांना लक्ष्य केले असे म्हणता येणार नाही. जी भूमिका स्पष्ट करायचे आहे ते आम्ही मांडली. ज्या राज्यात त्यांचे मुख्यमंत्री नाही राज्यांवर त्यांनी परवाच्या बैठकीमध्ये ज्या प्रकारची टीका केली. प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही. देशाचे प्रधानमंत्री हे संपूर्ण देशाचे असतात. ज्या राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार नाही त्या राज्यात बाबत प्रधानमंत्री यांनी जास्त संवेदनशील असायला हवे. याला आपण लोकशाही म्हणतो मात्र दुर्दैवाने महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड अशा राज्यांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धवजी ठाकरे वारंवार आवाज उठवत असतात आणि त्याचेच प्रतिबिंब आज अग्रलेखात दिसून आले." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -Hanuman Chalisa Case : राणा दाम्पत्याचा फैसला टळला, वेळ नसल्याने न्यायालय उद्या घेणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details