महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 13, 2022, 11:35 AM IST

Updated : Jul 13, 2022, 2:12 PM IST

ETV Bharat / city

Sanjay Raut Vs Eknath Shinde Faction : एकनाथ शिंदे यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांना अभिवादन, संजय राऊतांनी लगावला टोला

बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ( Eknath Shinde tweet ) ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, की बाळासाहेब हे गुरू होते. त्यांच्या गुरुर होता. त्यांनी आम्हाला सावरले. एकनिष्ठ शिवसैनिक बाळासाहेबांसोबत होते.

संजय राऊत एकनाथ शिंदे
संजय राऊत एकनाथ शिंदे

मुंबई- दरवर्षी गुरु पौर्णिमेला अनेक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करत असतात. मात्र, पहिल्यांदाच शिवसेनेत एवढी मोठी फूट पडल्याने जवळपास अर्धा पक्ष रिकामा झालेला असताना बंडखोर गटाकडून वारंवार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी बंडखोर गटावर निशाणा साधला असून ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन...

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, की बाळासाहेब हे गुरू होते. त्यांच्या गुरुर होता. त्यांनी आम्हाला सावरले. एकनिष्ठ शिवसैनिक बाळासाहेबांसोबत होते. एकनिष्ठ हीच गुरुदक्षिणा असते. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो. आज बाळासाहेब असते तर त्यांच्या स्टाईलमध्ये फटकारले असते. शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, की पक्षाने उत्तर दिले आहे. ही कायदेशीर लढाई आहे. रडीचा डाव आहे, तर न्यायालयात का गेला? असा गुरू होणे नाही यावेळी बोलताना राऊत म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे आमच्या सर्वांचे गुरु आहेत. फक्त शिवसेना किंवा शिवसैनिक नाहीतर ज्यांचं शिवसेनेवर प्रेम आहे, शिवसेनेवर निष्ठा आहे त्या सर्वांचे बाळासाहेब ठाकरे हे गुरु आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला एक दिशा दिली, मार्गदर्शन केलं. बाळासाहेबांनी आम्हाला सर्व काही दिले. कारण, गुरू हा मोकळ्या हाताने देत असतो. हे आमच्या हृदयात आहे. सर्व काही आमच्या हातात आलं असा गुरु होणे नाही."

हीच खरी दक्षिणा आणि मानवंदना-"बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला सुद्धा एक दिशा दिलेली आहे. अशा गुरूच फक्त गुरुपौर्णिमेला नाही तर दररोज आम्हाला स्मरण होत असतं. आजच्या दिवशी विशेष स्मरण होतंय. कारण, काही लोक बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाहेर गेली आणि म्हणतायत बाळासाहेब आमचे गुरु आहेत. आज बाळासाहेब जर असते तर त्यांनी यांच्यावर काय भाष्य केलं असतं हे समजून घेण्यासारख आहे. लाखो लोक त्यांना गुरू स्थानी मानतात आणि त्यांच्यासोबत निष्ठेने राहण्याचा प्रयत्न करतात. हीच खरी गुरूला दक्षिणा आणि मानवंदना आहे." अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा-शिवसेनेच्या संकटाच्या काळात शिवसेनेची भक्कमपणे बाजू मांडत खिंड लढवणारे ( Fighting for Shiv Sena in Crisis ) बाजीप्रभू उर्फ संजय राऊत स्वकीयांच्या तीव्र विरोधामुळे नाराज झाले आहेत. राऊत यांची मनधरणीसाठी आता सेनेची धावपळ सुरू झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मनधरणीसाठी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई ( Shiv Sena leader Subhash Desai ) यांना राऊत यांच्या मनधरणीसाठी पाठवले आहे. राऊत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपसोबत युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीसोबत सत्ता स्थापनेत राऊतांची ( succeeded in building with Congress NCP ) भूमिका महत्त्वाची होती. महाविकास आघाडीचे निर्मातेच संजय राऊतांना म्हटले जात होते. त्यांनी त्यांच्या कौशल्याने काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची मोट बांधण्यात यश मिळवले होते.

संजय राऊत यांनी गुंते वाढवले?कट्टर शिवसैनिक, बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत अशी ओळख असलेले एकनाथ शिंदे हे बंडखोरी ( Rebel Siv sena MLA ) करतील असं स्वप्नातही ठाकरे कुटुंबीयांनाच काय, तर एखाद्या शिवसैनिकालाही वाटलं नसेल. परंतु एकनाथ शिंदे यांची बंडखोरी ही साधीसुधी नसून तब्बल ४० शिवसैनिक आमदार सोबत घेऊन त्यांनी शिवसेना पक्षालाच खिंडार पाडलं. सध्याच्या घडीला शिवसेना पक्षाची झालेली ही वाताहात सावरायला किती वर्ष जातील, त्याचा अंदाज बांधणे सध्या तरी कठीण आहे. परंतु हे सर्व घडण्यामागे शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत हेच जबाबदार असून त्यांच्यामुळेच शिवसेनेची ही परिस्थिती झाली आहे, असा आरोप बहुतेक बंडखोर आमदारांनी केला आहे.

संजय राऊत लोकांची मन दुखावली -संजय राऊत आपली भूमिका दररोज वेगवेगळ्या भाषेत प्रकट करत आले आहेत. महाराष्ट्राची संस्कृती नसलेल्या भाषेत ते बऱ्याचदा बोलतात. त्यामुळे लोकांची मन दुखावली जातात. संजय राऊत यांनी कधी कुणाची आई काढली, कुणाला डुक्कर म्हणाले, कुणाचा बळी द्या म्हणाले असल्याचा आरोप बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी केला आहे. यानंतर शिवसेनेचे खासदार सुद्धा संजय रावतांवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. कालच मातोश्रीवर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार एनडीएच्या द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासंदर्भात संजय राऊत वगळता शिवसेनेच्या इतर खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला. परंतु, संजय राऊत यांनी त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यावरून तिथे सुद्धा खलबत्त सुरू झाले होते. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यामध्ये हस्तक्षेप करत एक दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असे सांगितले. त्या बैठकीतून सुद्धा संजय राऊत नाराज होऊन बाहेर पडले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

हेही वाचा-Sanjay Raut : संजय राऊत पुन्हा टार्गेट; वाचाळपणा नडला?

हेही वाचाShiv sena on President Election: राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही- संजय राऊतहेही वाचा-

Last Updated : Jul 13, 2022, 2:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details