मुंबई- महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षला बुधवारी पूर्णविराम मिळाला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेची पुढची भूमिका काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता शिवसेनेची पुढची भूमिका खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली असून 'आम्ही विरोधात राहणं पसंत करू' असं राऊत यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
बंडाला मी किंवा शरद पवार जबाबदार नाहीत. आज सेनेचे मीठ खातोय, पळून जाण्याची औलाद नाही. एकनाथ शिंदे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांना पश्चाताप होईल. उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपला. उत्तम खाती दिल्यानंतर आपल्याच लोकांनी दगा दिला. ज्यांना सरकार पाडायचे कॉन्ट्रॅक्ट होते, त्यांनी सरकार पाडले, अशी टीका शिवसेना संजय राऊत यांनी शिंदे गटावर ( Sanjay Raut slammed Shinde rebel group ) केली आहे.
खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नाही-यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण करण्यात आली हे त्यांनी संयमाने सांगितले म्हणून ते मुख्यमंत्री झाले. आणि, आज जी तोंडाची दाबादी वाजवत आहेत आणि शरद पवार किंवा माझ्यावर आरोप करताहेत त्यांना जे काय कॉन्ट्रॅक्ट मिळाला सरकार पाडण्याचे ते त्यांनी पाडले. सर्वोच्च न्यायालय निर्णयानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नसतो. आता आम्ही विरोधी पक्षात बसणं पसंत करतो."
उगाच काही कारणे देऊ नका-"काँग्रेस आणि राष्ट्रवादी ने त्यांना मुख्यमंत्री व्हावे अशी विनंती केली म्हणून ते मुख्यमंत्री झाले. हे सरकार पडलं त्याला उगाच शरद पवार आणि मला जबाबदार धरत आहेत. काहीतरी करणे द्यायची म्हणून देतात. हे तेच दीपक केसरकर आहेत जे त्यांच्या गटात सामील होण्याच्या आदल्या दिवशी माझ्यासोबत चहा पीत होते. त्यामुळे उगाच काही करणे देऊ नका." असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आता तुमचा मार्ग वेगळा-बंडखोर आमदारांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांनी एक साधा नगरसेवक तर निवडून आणून दाखवावा. असं वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, "शिवसेनेचा मुख्यमंत्री हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी जबाबदारी घेतो. तुम्ही कोणाला मुख्यमंत्री करणार आहात ? तुमचा नेता कोण आहे ? तुम्हाला आता धुणीभांडी करावी लागतील. आता तुमचा मार्ग वेगळा आहे... आमचा मार्ग वेगळा आहे."
उद्या ED च्या चौकशीला सामोरं जाणार-"मुख्यमंत्री त्या काळात नवीन होते. पण, त्यांचं नेतृत्व गुण काय आहेत ते महाराष्ट्रने पहिले आहे. आज माझ्याकडे जे काही आहे ते पक्षाचे देण आहे. मी शिवसेने सोबत होतो आणि नेहमी शिवसेने सोबत राहील. पक्षाच्या कामातून आता कुठे थोडा मला वेळ मिळालाय. त्यामुळे, मी उद्या ईडीला सामोरा जाणार आहे. जी कारवाई होईल त्याला तोंड देणार आहे. मी पक्षाचे काम करू नये यासाठी असा दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, मी मागे हटणार नाही." असा निर्धार राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया-खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Tweet ) यांनी ट्विटमध्ये म्हटले मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही,असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील ( Sanjay Raut praised Uddhav Thackeray ) जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!