मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut allegations on judiciary ) यांनी भाजप नेते किरीट सोमैया यांच्यावर आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या 58 कोटी रुपयांच्या निधीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या आरोपप्रकरणी सत्र न्यायालयाने किरीट सोमैया व त्यांचे पुत्र निल सोमैया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. मात्र, या दोन्ही पिता-पुत्राला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले. यावरून आता संजय राऊत ( Sanjay Raut on judiciary ) यांनी न्याय व्यवस्थेला लक्ष्य केले आहे.
हेही वाचा -IIT Mumbai : आता आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम.. मास्टर ऑफ आर्ट्स बायो रिसर्च
न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक -मागचे अनेक महिने मी बघतोय एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच आणि त्यांच्या समर्थकांना अटकेपासून संरक्षण मिळत आहे. त्यांचे जामीन मंजूर होतात. त्यामुळे, मी न्यायालयाचा पूर्ण आदर ठेवून हे सांगतोय या न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचा मोठा भरणा आहे आणि हेच लोक यांना पाठीशी घालत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.