मुंबई -मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि हीच गोड बातमी असेल असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. जर भाजपकडे १४५ आमदारांचे संख्या बळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवनसेना सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हीच गोड बातमी, संजय राऊतांनी भाजपला डिवचले - शिवसेना लेटेस्ट न्यूज
मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आणि हीच गोड बातमी असेल असे संजय राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले भाजपकडे १४५ आमदारांचे संख्या बळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे .

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी कळेल असे वक्तव्य मंगळवारी केले होते. त्यावर भाष्य करताना राऊत यांनी मुनगंटीवर यांना चिमटा काढला. गोड बातमी ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि ती मुनगंटीवारच देतील, असे त्यांनी सांगितले.
शिवसेनेमुळे सरकार स्थापनेत अडथळा नसल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. चर्चा भाजपमुळेच थांबली असल्याचेही ते म्हणाले. जे निवडणुकीपूर्वी ठरले आहे तेच द्यावे, याची आठवणही त्यांनी भाजपला यानिमित्ताने पुन्हा एकदा करून दिली.
Last Updated : Nov 7, 2019, 2:54 PM IST