मुंबई :बिहारमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए जास्त जागांवर पुढे असले, तरी महागठबंधनही जास्त मागे नसल्याचे दिसून येत आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होताना दिसत असल्याचे ते म्हणाले आहेत.
आतापर्यंत जे कल हाती आले आहेत, त्यानुसार बिहारमधील एक तरुण नेता केंद्रातील सत्तेला कांटे की टक्कर देतो आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, बिहारमधील लोकांना जो बदल हवा होता, तोदेखील आता दिसून येत असल्याचे ते म्हणाले.