मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दांपत्याचा आता आणखी एक कारनामा संजय राऊत यांनी पुढे आणला आहे. राऊत यांनी मंगळवारी ट्विट करत दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित असलेल्या युसुफ लाकडवाला याच्याकडून राणा दाम्पत्याने 80 लाखाचं कर्ज घेतल्याचा हा आरोप होता. यासंदर्भात आज पुन्हा संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून ED ने राणा दांपत्याची चौकशी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
काय म्हणाले राऊत? - युसूफ लकडावाला याला 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. तो अटकेत असताना त्याच्या अकाउंट मधून ज्या ज्या लोकांना पैसे गेले अथवा ज्यांनी ज्यांनी त्याच्याशी आर्थिक व्यवहार केले त्या सर्वांची चौकशी झाली. मग या राणा दाम्पत्यालाच का सुट दिली? युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणाच्या खात्यात आहे. मग ED ने ही सूट का दिली?" असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.