मुंबई -राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस अधिक तिव्र होताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी राऊत यांनी 'राज्यात कर्नाटक प्रमाणे घोडेबाजार करण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र इथे ते तंत्र चालणार नाही', असे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा... राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार, 'असा' आहे इतिहास
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला एकट्याला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नाही. मात्र युतीला स्पष्ट बहुमत आहे. परंतु मुख्यमंत्री पदावरून युतीचे घोंगडे अडकले आहे. यातच राज्यात सत्ता स्थापनेसाठी कर्नाटक प्रमाणे घोडेबाजार होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, आम्ही सर्व एक असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे ;
- पैसा आणि सत्तेच्या जोरावर कर्नाटक प्रमाणे घोडाबाजाराचा प्रयत्न
- कर्नाटक पॅटर्न इथं महाराष्ट्रात चालणार नाही, आम्ही सर्व एक आहोत
- भाजपकडे बहुमत असेल तरच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील