महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यपालांच्या साक्षीने संविधानाची हत्या - संजय राऊत

अंधारात शपथ देऊन राज्यापालांनी संविधानाची हत्या केली असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

sanjay raut
संजय राऊत

By

Published : Nov 26, 2019, 10:37 AM IST

Updated : Nov 26, 2019, 10:49 AM IST

मुंबई- अंधारात शपथ देऊन राज्यापालांनी संविधानाची हत्या केली असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच सोमवारी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीनही पक्षांच्या आमदारांनी शपथ घेतली होती. तो कार्यक्रम हा शक्तीप्रदर्शनासाठी नसून आमच्याकडे आहे ते आम्ही दाखवले असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांची पत्रकार परिषद

हेही वाचा -'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा

बहुमताचे खोटे कागदपत्रे दाखवून फसवणूक करून चोरट्यांसारखी त्यांनी शपथ घेतली. यांना शपथ देणारे घटनेचे पालक असलेले राज्यपाल यांच्या साक्षीनेच संविधानाची हत्या केली. तसेच एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला इतकेच आम्ही जाणतो, तर दुसऱ्या भगतसिंगांच्या सही-शिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यामुळे सामना अग्रलेख आणि संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून एकंदरीत शिवसेनेचा जास्ती रोष हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर असल्याचे स्पष्ट होते आहे. तसेच कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली? अशी विचारणा राऊत यांनी केली.

दरम्यान, जयंत पाटील यांनाच सर्व अधिकार असून तेच राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते असल्याचे राऊत यांनी सांगितले. भाजपकडून तीनही पक्षांच्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी आमच्याकडे 162 आमदार होते, तर बहुमताच्या दिवशी हाच आकडा 170 पर्यंत जाणार आहे.

अजित पवार हे जागतिक नेते आहेत. त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. ते आमच्या मांडीला मांडी लावून बसत होते. ते महान विचारांचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीच बोलणार नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Nov 26, 2019, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details