मुंबई- खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Tweet ) यांनी ट्विटमध्ये म्हटले मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही,असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील ( Sanjay Raut praised Uddhav Thackeray ) जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ. तुरुंगात जाऊ. पण बाळासाहेबांची शिवसेना धगधगत ठेऊ!
मी शरद पवार यांचे आभार मानतो.त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या मुलास सांभाळून घेतले. मार्गदर्शन केलं.स्वतःचे लोक दगाबाजी करत असताना शरद पवार उद्धवजीचया मागे ठामपणे उभे राहिले.काँग्रेस नेत्यांनी देखील सदैव समन्वयाची भूमिका घेतली.सत्ता येते सत्ता जाते. अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही!
काय घडले राजीनामा नाट्य-बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या ( rebel Eknath Shinde ) पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) उद्या गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याने ठाकरे सरकारला मोठ्ठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.