पणजी (गोवा) - मुंबईत झालेले आंदोलन हे सरकारच्या काही विभागांचे अपयश असून या आंदोलनाची माहिती नसणे हे त्यांचे दुर्दैव असल्याचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on Student Agitation ) यांनी सांगितले. हे आंदोलन भडकवायला मुंबईतील आणि राज्यातील काही पक्ष कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा गरिबांचा गळा घोटणारा -
बजेटमध्ये मोदी धांदडग्यांना उभारी देणार मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा गरिबांचा गळा घोटणारा अर्थसंकल्प आहे. यातुन गरिबांचे वाटोळे केले जाणार असून मोजक्याच धनदंडग्यांचा उद्धार केला जाणार आहे, असेही राऊत म्हणाले.