मुंबई- शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Sanjay Raut on Eknath Shinde ) व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित भेटणार असल्याचे रविवारी ट्विट ( Sanjay Raut on Deepali Sayyed statement ) केले होते. त्यावरून राज्यातील राजकारणात मोठे बदल होतील, अशा चर्चा सुरू आहे. मात्र, शिवसेना संजय राऊत यांनी याबाबत सूचक ट्विट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोरीमुळे एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे असे चित्र निर्माण झाले आहे. त्यावर शिवसेना संजय राऊत यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,
सिढिया चढते हुए जो उतरना भूल जाते है.. वे घर नहीं लौट पाते... नरेंद्र सक्सेना
काय केले होते दिपाली सय्यद यांनी ट्विट-येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटल्याचे शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थिकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री ( 16 जुलै ) केले आहे.
संजय राऊतमुळे शिवसेनेवर संकट ओढवल्याची चर्चा - शिवसेना नेते संजय राऊत यांच्यामुळेच शिवसेनेवर हे संकट ओढवल्याची चर्चा आहे. दिपाली सय्यद यांनी यावरुन राऊतांची पत्रकार परिषदेत रविवारी पाठराखण केली आहे. राऊत आक्रमक आणि परखड बोलतात. पक्षाची भूमिका मांडतात. ते बिनधास्त आहेत. त्यांची भाषाशैली तशीच आहे. शिवसेनेला पाठिंबा देणे, ही भावना त्यांच्या बोलण्यातून वेळोवेळी दिसून येते. संजय राऊत त्याचे काम करत आहेत. भाजपलाही त्याच पद्धतीने बोलतात. परंतु, राऊतांनीही थोडी शांतता घ्यावी आणि ठाकरे आणि शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे यावेळी सय्यद म्हणाल्या.
शिवसैनिक एकत्र येत असतील, तर सर्वांनाच आनंद -शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सर्वसामान्य शिवसैनिक व्यथीत झाला आहे. अनेकांनी शिंदे यांच्या भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दोघांनी एकत्र यावे, असे अनेकांना वाटते. मी सुध्दा साधी शिवसैनिक आहे. आमचे शिवसैनिक एकत्र येत असतील, तर सर्वांनाच आनंद आहे. त्यासाठी मी सर्वांचे आभार मानालया कमी पडणार नाही. मग भाजप असो, शिंदे असो किंवा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो सर्वांचे आभार मानेन, असे दिपाली सय्यद यांनी सांगितले. तसेच दोन्ही बाजूच्या नेत्यांना भेटल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून मान अपमानचा मुद्दा कळीचा ठरत असल्याचे जाणवले. तो दूर झाल्यास सर्व गोष्टी चांगल्या होतील, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांनी टोचले कान-शिवसेनेचे 40 आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) झाले. मात्र, त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे लवकरच एकत्र येणार असल्याचे विधान शिवसेना नेत्या, अभिनेत्री दिपाली सय्यद ( Dipali Sayyed ) यांनी केलं होते. त्यावरुन शिवसेनेच्या नेते, खासदार संजय राऊत ( Mp Sanjay Raut ) यांनी सय्यद यांचे कान टोचले आहेत. 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही. त्यामुळे विचारपूर्वक बोला,' अशा शब्दांत संजय राऊत यांनी सय्यदांना खडसावलं ( sanjay raut on dipali sayyed ) आहे.