मुंबई-शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत ( Shivsena party hijack ) नाही. पक्षाचा विस्तार करण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर (MP Sanjay Raut latest news ) दिली आहे. शिवसैनिक आदेशाची वाट पाहता, असा त्यांनी गर्भित इशाराही बंडखोर आमदारांना दिला आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut on political crisis ) म्हणाले, की पैसे देऊन कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. हा बाळासाहेबांची शिवसेना आहे. हजारो लाख शिवसैनिकांच्या बलिदानातून शिवसेना उभी आहे. पक्ष एकसंघ व मजबूत आहे. बंडखोर आमदार हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नाही. त्यांच्या कुटुंबांची सुरक्षेची जबाबदारी नसते. बकरीसारखे बें, बें करू नका, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावला. देवेंद्र फडणवीसांनी या भानगडीत पडू नये, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा टोला, त्यांनी लगावला.
शुक्रवारी काय म्हणाले होते संजय राऊत-आम्ही हार मानणार नाही, फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिंकणार, ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे काम केले. शरद पवारांशी चर्चा झाली. पूर्ण तयारी आहे, तुम्ही या. महाविकास आघाडी मजबूत, सरकार अडिच वर्षे पूर्ण करून सत्तेत येईल. गृहमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, त्यांना कायदा माहिती आहे. त्यांनी आणि अनिल देसाईंमध्ये कायदेशीर कारवाईची चर्चा झाली, जे आम्हाला करायचे ते केले. पवार भिष्मपितामह. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यात सातत्याने चर्चा. महाविकास आघाडी एकसाथ. अल्टिमेटम संपले, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हाणाले.