महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on ED raid: तरीही शिवसेना सोडणार नाही, संजय राऊत यांची ईडीच्या धाडीवर प्रतिक्रिया - संजय राऊत शिवसेना लढा

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers दोनदा समन्स बजावले होते.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Jul 31, 2022, 8:59 AM IST

Updated : Jul 31, 2022, 10:41 AM IST

मुंबई- शिवसेनेचे फायरब्रँड मानले जाणारे खासदार संजय राऊत हे अडचणीत आले आहेत. ईडीने पत्राचाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देणारे ट्विट केले आहे. त्यांनी घोटाळ्याशी संबंध नसल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers ) दोनदा समन्स बजावले होते. ईडीची कारवाई सुरु असतानाच संजय राऊत यांनी लढा सुरुच ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. तरीही शिवसेना सोडणार नाही.. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.

संजय राऊत यांचे ट्विट

मुंबईतील पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ( Shiv Sena leader MP Sanjay Raut ) भांडूप येथील घरी आज ईडीने धडक देत कारवाईला सुरुवात केली. ईडीने यापूर्वी ( ED Officers ) दोनदा समन्स बजावले होते. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राहू त्यांनी वेळ मागवून घेतली ( ED Raid Sanjay Raut home ) होती. मात्र सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केल्याने राऊत यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.


सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप-संजय राऊत यांनी सूडाचे राजकारण सुरू असून ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरु आशिष कंट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान अन्य संचालकांना हाताशी घेत चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या एफएसआय मधून अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तब्बल १०७४ कोटी रुपये बेकायदा जमवले. मात्र पत्राचाळीचा एकही इंच पुनर्विकास केला नाही, असा संजय राऊत आरोप त्यांच्यावर आहे.

हेही वाचा-Commonwealth Games 2022 : चहावाल्याच्या मुलाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिले पहिले पदक; सांगलीत जल्लोष

हेही वाचा-Devendra Fadnavis Warning : धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच येईल - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सूचक इशारा

हेही वाचा-ED Raid at Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, अटक होण्याची शक्यता

Last Updated : Jul 31, 2022, 10:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details