मुबंई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत घरचे जेवण देण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी -संजय राऊत यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात येण्यापूर्वी त्यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अडीचच्या सुमारास सत्र न्यायालयात पिढीचे हे घेऊन आले होते. तीन वाजता संजय राऊत यांच्या रिमांडवर न्यायमूर्ती देशपांडे यांच्यासमोर युक्तीवादाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्वात प्रथम ईडीच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद सुरुवात केली. ईडीच्यावतीने न्यायालयासमोर सांगण्यात आले की, या प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्याकरिता फ्रंटमॅन म्हणून काम करायचे. तसेच संजय राऊत आणि या प्रकरणात 1 कोटी 20 लाख रुपयाचा लाभ घेतला आहे.
संबंधित साक्षीदार दबाव - यापूर्वी देखील संजय राऊत यांना ईडी अधिकाऱ्यांकडून तपासाकरिता तीन वेळा समन्स देण्यात आला होता. मात्र, संजय राऊत केवळ एकच वेळा उपस्थित राहिले होते. त्यामुळे या प्रकरणातील इतर संबंधित साक्षीदार यांच्यावर दबाव देखील आणण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यासंदर्भातील तक्रार देखील साक्षीदाराने संबंधित पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊत यांची या प्रकरणात चौकशी होणे अतिशय महत्त्वाचे असल्याने त्यांना 8 दिवसाची ईडी कोठडी देण्यात यावी अशी मागणी देखील ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.
राजकीय वैमनस्यातून कारवाई -संजय राऊत यांचे वकिल अशोक मुंदरगी यांनी त्यांच्या युक्तीवादात असे म्हटले की, संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय वैमनस्यातून कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात 112 कोटी रुपयांचा या प्रकरणात घोटाळा झाला असल्याचे ईडीने म्हटले आहे. वास्तविक ईडीकडून कुठलेही पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले नाही. संजय राऊत हे राजकीय नेते आहे. त्यांनी रीतसर तपास यंत्रणा उपस्थित न राहण्याचे कारण देखील ईडी अधिकाऱ्यांना सांगितले होते. तसेच तपासा सहकार्य देखील करणार असे आश्वासन देखील दिले होते. संजय राऊतला ईडीने समान दिला त्यावेळी त्यांनी कोणत्या कारणामुळे सध्या चौकशीला येऊ शकत नाही. या संदर्भातील देखील माहिती ईडीला दिली होती. राज्यात, देशात महत्त्वपूर्ण निवडणुका पार पडत होत्या. त्या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांना समान भजनात आले होते. एका पक्षाचे महत्त्वपूर्ण नेते असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात जबाबदारी होती त्यामुळे ते त्यावेळी तपासाला जाऊ शकले नव्हते. मात्र वेळ मिळाला त्यावेळी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन चौकशीला सहकार्य देखील केल्या होते असे देखील संजय राऊत यांच्या वकिलांनी युक्तीवाला दरम्यान कोर्टासमोर म्हटले आहे.