मुंबई -देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात बातचीत होत असते. मात्र राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. फडणवीस यांचे देखील हेच म्हणणे आहे. आपण पाहिले असेल अमीर खान आणि किरण राव यांचे रस्ते वेगळे झाले मात्र मित्र कायम आहेत. सेम आमचे तसेच आहे. रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम आहे. आमची मैत्री कायम राहील. मात्र याचा अर्थ हा नाही की, आम्ही सरकार बनवण्यासाठी जात आहोत. परिस्थिती आत्ता काय आहे आणि उद्या काय असेल याचे भविष्य कोणीच सांगू शकत नाही. माझ्यापेक्षा जास्त माहिती फडणवीसांकडे असते. या क्षणी महाराष्ट्रात जे सरकार आम्ही बनवले आहे, ते उत्तम सुरू आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणा, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
राजकारणात मार्ग बदलतात, मैत्री कायम राहते- संजय राऊत - संजय राऊतांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेसोबत आमची दुश्मनी नाही. मी देखील अनेक दिवसांपासून हेच म्हणत आहे. आम्ही काय भारत- पाकिस्तान थोडीच आहोत. भेटीगाठी होत असतात बातचीत होत असते. मात्र राजकीय दृष्ट्या आमचे रस्ते वेगळे झाले आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांचे महत्त्वाचे मुद्दे -
- भविष्यात मुख्यमंत्री नक्कीच पत्रकारांसोबत बोलतील. एकंदरीत परिस्थिती पाहता ते गर्दीत जात नसावेत.
- मोहन भागवत यांनी जे सांगितले आहे ते बरोबर आहे. आपल्या सर्वांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे धर्माचा आणि जातीचा विषय येत नाही. आम्ही भागवत यांच्या मताशी सहमत आहोत.
- नितिन गडकरी यांच्या बाबतच्या प्रकरणाची मला माहिती नाही. ज्याबाबत माहिती नाही त्याबाबत शिवसेना बोलत नाही. आरोप प्रत्यारोपांचे धंदे शिवसेना करत नाही.
- ज्या कंपनीबाबत सामनामध्ये लिहिण्यात आलेले आहे. त्याबाबत आमच्या पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यांच्याजवळ सर्व माहिती आहे.
- महाविकासआघाडी सरकारने जाहिराती वर 155 कोटी खर्च केले आहेत फक्त शिवसेनेने नाही.
- विरोधीपक्ष अधिवेशन होऊ देत नाहीत हे त्यांचे अपयश आहे. आम्हाला वाटते की उलट 2 दिवस व्यवस्थित अधिवेशन पार पडावे. आम्हाला वाटते महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या प्रश्नबाबत व्यवस्थित चर्चा व्हावी. तुम्ही दबाव टाकण्यापेक्षा काय करायला हवे याबाबत बोला. तुम्ही केवळ गोंधळ करणार असाल तर ना राज्य चालेल नाही देश चालेल. ही बाब मी नाही मोदी म्हणतात.
हेही वाचा -'महाराष्ट्रातील अर्धे प्रश्न केंद्राच्या नाकर्तेपणामुळेच; विरोधक कोणाची कोंडी करणार?'