मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे शीर्षक नेमकची बोलणे असल्याने हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊ. तसेच हे पुस्तक देताना शीर्षकाचे फुल करून आम्ही त्यांना सांगू असा टोला शिवसेना नेते संजय राऊत ( Sanjay Raut criticizes Narendra Modi ) यांनी लगावला आहे. "भारतीय जनता पक्षाला देशात एक्य नको" शरद पवारांनी हे आपल्या भाषणातून पंचवीस वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र आम्हाला ते दोन वर्षापूर्वी समजले. भाजपा देशाला मागे घेऊन चालले ते आम्हाला आता समजले, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर केली.
राऊतांची पंतप्रधानांवर टीका -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 61 भाषणाचं 'नेमकीच बोलणें' या पुस्तकाचे प्रकाशन ( Sharad Pawar speech book Published in Mumbai ) करण्यात आले. यावेळी भाषणादरम्यान संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान यांच्यावरही टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे शीर्षक नेमकी चे बोलणे असल्याने हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देऊ. तसेच हे पुस्तक देताना शीर्षकाचे फुल करून आम्ही त्यांना सांगू असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी व्यक्त केलेले 25 वर्षापूर्वीचे त्यांच्या विचारांवर ते आजही ठाम आहेत. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईतील मराठी माणसाला आपल्या जमिनी विकू नका असे आवाहन केले होते. दोन महिन्यापूर्वी वरळीच्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला आपली घरं न विकण्याचा आवाहन केले. म्हणजेच 25 वर्षा आधी जे शरद पवार म्हणत होते ते आजही म्हणत आहेत. देशांमध्ये संवाद होऊ द्यायचा नाही. केवळ झुंडशाही सुरू आहे असे संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून सांगितले. तसेच कवी किशोर कदम यांच्या कवितेचा दाखला देत महा विकास आघाडी मधील तिन्ही पक्षांनी एकमेकांना हात दिला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
खुर्ची का दिली? असे वाटत असेल तर पुस्तक वाचा -