मुंबई -बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात देखील भाजपचे कार्यकर्ते साजरा करत आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, असा घणाघात राऊत यांनी केला आहे.
बेळगाव महाराष्ट्रात यावा या मागणीसाठी शेकडो मराठी बांधवांचा बळी गेला. महाराष्ट्रातील 69 लोकांचा बळी गेला. बाळासाहेब ठाकरे तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत तुम्हाला, असे म्हणत राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. तुम्ही पेढे वाटता. ठीक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मात्र मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला आहे. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाहीत, असे राऊत म्हणाले.
हे ही वाचा -INS 'Hansa' Diamond Jubilee : गोव्याच्या मुक्तीसंग्रामात नौदलाचे विशेष योगदान, राष्ट्रपतींकडून गौरवोद्गार