मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरला ( PM Narendra Modi Follow Hitler ) फॉलो करतात. हिटलर प्रमाणेच त्यांचे इव्हेंट सुरू असल्याची घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut Criticized PM Narendra Modi ) यांनी केली आहे. आमच्या अंगावर येऊ नका, अन्यथा डंपिंग ग्राऊंडला असाल, असा सूचक इशारा राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला ( Bhartiya Janta Party ) दिला आहे. मुंबईत आज शिवसैनिकांचा सोशल मीडिया ( Shivsena Social Media Cell ) सेलचा मेळावा पार पडला. दरम्यान, राऊत बोलत होते.
'सर्वसामान्य लोक वाचत नाहीत' -सोशल मीडिया हा विषय माझा नाही. सोशल वर्क तसे सोशल मीडिया करा. खूप तांत्रिक गोष्टी यात आहेत. मला इंग्लिश येत नाही, मी मराठीत लिहितो, सामना मराठीत निघतो. पण देशभरात बातमी होते. शिवसेनेशिवाय सोशल मीडिया पुढे जाऊ शकत नाही. बाळासाहेब आमचे फेस होते, त्यावेळी सोशल मीडिया कुठे होती? हिटलर सगळ्यांना प्रिय होता, बाळासाहेबांना देखील आवडायचा. आता पंतप्रधानांनाही हिटलर आवडतो. मोदी हिटलरला फॉलो करतात. ज्या प्रकारचे इव्हेन्ट हिटलर करायचा, त्याचप्रकराचरे इव्हेन्ट आता मोदी करत आहेत. मी टीका करत नाही. मात्र, हिटलरच्या आत्म चरित्रात राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रपोगंडा व प्रचाराला महत्व फार आहे. सर्वसामान्य लोक वाचत नाहीत. त्यांच्या डोक्यात जाईल, अशा गोष्टी करण्यावर हिलटर भर द्यायचा. आपल्या देशात सुध्दा अशाच प्रकारची राजनिती सुरु आहे, अशी खरमखरीत टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
'कोथळा बाहेर काढू' -मुंबईत शिवसेनेची ताकद आहे आणि पुढेही निश्चित राहील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त करताना, मागून वार करु नका, अन्यथा कोथळा काढू. तसेच मागून वार करणे सोडून द्या. तसा प्रयत्न केला तर, डम्पिंग ड्राऊंडला असाल, असा इशारा दिला. बाळासाहेबांनी गरम रक्ताची पिढी तयार होती, ती जपली पाहिजे. सैन्य पोटावर चालते, पण आमची एक पिढी वडापाव वर लढत होती, असे गौरवोद्गार संजय राऊत यांनी काढले.