महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on Governor : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा - शिंदे सरकार मंत्रिमंडळ विस्तार घटनात्मक

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराव (Shinde Government Cabinet Expansion) विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. तसेच त्यांनी घेतलेले निर्णयही घटनात्मक वैध नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत
संजय राऊत

By

Published : Jul 16, 2022, 8:03 PM IST

Updated : Jul 16, 2022, 10:18 PM IST

मुंबई - सध्या राज्यात शिंदे-फडणवीस (Eknath Shinde Government) यांचे सरकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रिमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येच्या मंत्रिमंडळाला (Shinde Government Cabinet Expansion) घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ जे निर्णय घेते त्याला घटनात्मक वैधता नाही, असा खोचक सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांना विचारला आहे.

विरोधकांकडून टीका -शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराव (Shinde Government Cabinet Expansion) विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घटनेचा दाखला देत थेट राज्यपालांना सवाल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. तसेच त्यांनी घेतलेले निर्णयही घटनात्मक वैध नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा -घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. या संदर्भात संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, बरबोडा या देशाची लोकसंख्या साधारण दीड लाख आहे आणि दीड लाख लोकसंख्येच्या देशात 27 कॅबिनेट मंत्री आहेत. आणि आपल्या बारा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात फक्त दोघंच जण निर्णय घेत आहेत. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा जोपर्यंत आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी.' अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी -राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केले होते. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले आणि गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दोन दिवसांचे अधिवेशन घेत तातडीने विधानसभा अध्यक्षांची निवडही करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर विराजमान झाले. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरकारने आपले बहुमतही सिद्ध केले आहे. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झाला नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, अशी विधाने एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे करत आहेत. मात्र, या विस्तारावर आता विरोधकांना आक्रमकपणे टीका करायला सुरूवात केली आहे.

काय आहे प्रकरण - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच मिळून सध्या मंत्रिमंडळात बैठका घेत आहेत. या बैठकांमध्ये आरे मेट्रो कारशेड प्रकल्पाचा विषय असेल अथवा बुलेट ट्रेनचा विषय असेल असे विविध वादाचे निर्णय सध्या हे दोघेच घेत आहेत. मात्र या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट करत राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल केला आहे. या दोघांच्या कॅबिनेटला आणि त्यांनी घेतलेल्या निर्णय घटनात्मक वैधता नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमधून म्हटले आहे.

संजय राऊत यांनी आधाही केली होती टीका -याआधी देखील संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मात्र, ही शपथच घटनात्मक दृष्ट्या बेकायदेशीर असल्याचे संजय राऊत यांनी आधी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा संजय राऊत यांनी घटनेतील नियमावलीचा फोटोच पोस्ट करत राज्यपालांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर, या आधी संजय राऊत म्हणाले होते की 'ठाकरे सरकार अस्तित्व असताना राज्यपाल आम्हाला नेहमीच कायद्याची आणि घटनेची जाणीव करून द्यायचे, हे राज्यपाल आता कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता.

संजय राऊत यांचे ट्विट -भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही

राज्यपाल,

हे काय सुरू आहे ?

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार -मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ते काँग्रेससोबत कधीच जाणार नाहीत आणि मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतोय. मी कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -Deepak Kesarkar : मी बाळासाहेब ठाकरेंना फॉलो करतो. कधीही काँग्रेससोबत जाणार नाही - दीपक केसरकर

Last Updated : Jul 16, 2022, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details