मुंबई -सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपने शिवेवसेनेवर खापर फोडणे अत्यंत चुकीचे आहे. या उलट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव होता, असा घणाघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. यावेळी बोलतना त्यांनी काश्मीरमध्ये महबूबा मुफ्ती सोबत भाजपचा लव्ह जिहाद होता का?, असा पश्न विचारत भाजपवर निशाना साधला आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी मिळालेला वेळ अत्यंत कमी आहे. मात्र, आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करून लवकरच महाराष्ट्राला स्थीर सरकार देऊ असा विश्वासही राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
राऊत म्हणाले, भाजपचे कालचे निवेदन खेदजनक आहे. ते सत्ता स्थापन करू शकत नाहीत, याचे खापर शिवसेनेवर फोडणे अत्यंत चुकीचे आहे. प्रसंगी आम्ही सत्ता लाथाडू पण, शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद किंवा ५०-५० ट्क्के फॉर्मुल्यावर ते ठाम राहिले नाहीत, हा त्यांचा अंहकार होता. त्यांनी शिवसेनेवर खापर फोडू नये. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये.
भाजपने शिवसेना आमच्यासोबत येणार नाही आम्ही सरकार स्थापन करत नाही. असे सांगत आम्ही विरोधात बसण्यास तयार आहोत, असे स्पष्ट केले. मात्र, त्यांना त्यांचा अंहकार नडतोय ते विरोधात बसायला तयार आहेत मात्र जे ठरलेय ते करयला का तयार झाले नाहीत, असा सवाल राऊत यांनी केला.