मुंबई -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. उत्तरप्रदेशात गुंतवणूक व फिल्म इंडस्ट्री बनावी, यासाठी चर्चा करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ''मुंबईला अनेकांनी ओरबाडून नेण्याचे प्रयत्न केले, पण ते त्यांना शक्य झाले नाही. मुंबई ही मुंबई आहे'', अशी टीका त्यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, ''मुंबईतील फिल्मसिटी तुम्हाला हलवता येणार नाही. आता लखनऊ येथे उभारत आहेत, नोएडा येथे उभारली त्याचे काय झाले. योगीजी तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील इंडस्ट्रीतही जातील का? की फक्त मुंबईशीच पंगा घेत आहेत? यापूर्वी अनेकांनी मुंबईला ओरबडून नेण्याचे प्रयत्न केले.''