मुंबई- देशात पाच राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातही त्याचे वारे वाहत असून शिवसेना आणि भाजपामध्ये उमेदवारी वरून चांगलीच जुंपली आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांनी गोव्यात निवडणुका ( Goa Election 2022 ) लढवावी, अशी खोचक टीका केल्यानंतर राऊत यांनी 'सगळी येड्यांची जत्रा आहे, ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो', अशा शब्दांत ( Sanjay Raut Criticize on BJP ) कानपिचक्या दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हा वाद चिघण्याची शक्यता आहे.
गोव्यात भाजपा नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल पर्रीकर ( Utpal Parikar ) हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सर्व राजकीय पक्षांनी पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवारी देऊ नका, असे आवाहन करताना भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, राऊत यांनी गोव्यातून लढावे, आव्हान केले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी 'सगळीच येड्यांची जत्रा', असे ट्विट करत ( Sanjay Raut tweet ) चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो, असे टोला लगावला आहे. यावेळी हातात पेन घेतलेला चंद्रकांत पाटील यांचा अविर्भावात भाष्य करत असल्याचा फोटोही ट्विटर टाकला आहे.