मुंबई - छत्रपती संभाजी राजेंना ( Sambhaji Raje ) राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून खुली ऑफर आहे. ते मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेचे शिवबंधन बांधतील, अशा चर्चा सुरू होत्या. राज्यसभेवर जाण्यासाठी शिवबंधन बांधावे लागेल, अशी अट शिवसेनेने संभाजी राजेंसमोर ठेवली आहे. मात्र, आतापर्यंत ते अपक्ष म्हणून निवडणूक ( Rajya sabha election news ) लढवण्याच्या आपल्या मुद्द्यावर ठाम आहेत. यावर आता शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेच्या वाटेच्या दोन जागा शिवसेनेच्याच असून दुसऱ्या पक्षाला ( Sanjay raut on Sambhaji Raje ) पाठींबा देणार नसल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर अपक्ष लढल्यास संभाजी राजेंचा ( Sambhaji Raje rajya sabha ) राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -संभाजी राजे भूमिकेवर ठाम, शिवसेना प्रवेशाची ऑफर नाकारली, राज्यसभेची चुरस वाढली
काय म्हणाले राऊत ? - राऊत म्हणाले की, राज्यसभेच्या सहा जागा रिक्त आहेत. ज्यात शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. या दोन जागा शिवसेनेच्या हक्काच्या जागा असल्याने त्या जागांवर कट्टर शिवसैनिकच निवडून जाईल. त्या आमच्या हक्काच्या जागा आहेत, आमचा कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही, मग तो कोणीही असो. आणि हे माझे मत नाही तर स्वतः उद्धव ठाकरे यांची 'मन की बात' आहे. आम्ही आमच्या जागा इतरांसाठी सोडणार नाही, असे राऊत म्हणाले.