मुंबई - काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आतंकवाद्यांनी ( Terrorism in Kashmir ) डोके वर काढले आहे. आतंकवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये रोज चकमकी होत आहेत. यात आपल्या देशाचे ( Sanjay Raut on BJP over Terrorism ) जवान हुतात्मा होत असल्याने सध्या हा कळीचा मुद्दा बनला आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून, केंद्रातले सरकार काश्मिरी जनतेचे, देशातील जनतेचे, जवानांचे रक्षण करू शकत नाही, असा थेट आरोप ( Sanjay Raut on Kashmiri pandit in Kashmir ) केला आहे.
हेही वाचा -अश्लील संदेश विरोधात भाजप प्रदेश सचिव दिव्या ढोले यांची पोलिसांकडे तक्रार
सरकार अपयशी -राऊत म्हणाले की, 370 कलमचा विषय नाही किंवा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून देखील काही फरक पडलेला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याच्या संदर्भात त्यांनी सरकारला सूचना केली आहे. केंद्रातले सरकार ( BJP ) हे प्रखर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहे. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. काश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे खतम होईल, असे सांगणारे सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचे जवानांचे, आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी जे या देशाची सेवा करताना शहीद होत आहेत, त्यांचे रक्षण करू शकत नाही.