नागपूर- पायऱ्यांवर बसायचे असेल तर बघू किती बसता, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांना लोकशाहीत विरोध करायचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी विधायक काम करावे. त्याचबरोबर भाजपने आंदोलनाची पायरी सोडावी व जनतेच्या कामांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपला केले आहे. तसेच येत्या 29 डिसेंबरला शरद पवार यांची मी पुण्यात मुलाखत घेणार असल्याचे राऊत म्हणाले.
हेही वाचा -'देवाला एकदाच रिटायर्ड करून टाकायला हवं' असं डॉ. लागू का म्हणाले होते?
सावरकरांना कलंक बोलणारेच आज भाजपमध्ये आहेत. त्यामुळे सध्याचे राजकारण हे विचारधारेवर फार चालत नसल्याचे राऊत यांनी सांगितले. राऊत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
हेही वाचा -डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप