मुंबई -शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात अटक केली आहे. संजय राऊत यांची आज गुरुवार (दि. 4 ऑगस्ट)रोजी कस्टडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. ( Sanjay Raut In ED Custody ) त्यावेळी संजय राऊत यांनी कोर्टात धनुष्यबाण चिन्ह असलेला भगवा गमछा घालून आले होते. मात्र, आपण कोर्टात आहोत हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तो गमछा गळ्यातून काढला.
पत्राचाळ प्रकरण - मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर कोर्टात हजर केले असता 3 दिवसांची कोठडी सुनावली होती. ( Sanjay Raut ED custody increased ) आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष ईडी कोर्टात हजर केले होते.
मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी - संजय राऊत कोर्टात येण्यापूर्वी कोर्ट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात लावण्यात आला होता. संजय राऊत यांच्या समर्थनात अनेक शिवसैनिकांनी कोर्ट परिसरामध्ये जमले होते. ( Sanjay Raut came to the court wearing a saffron muffler ) संजय राऊत हे गेटमधून आत येताना आणि बाहेर जाताना शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केल्या होत्या.
ईडीने कोर्टाची माफी मागितली - संजय राऊत कोर्टात आल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष पी. एम. एल. ए कोर्टाचे न्यायाधीश देशपांडे यांनी त्यांना विचारले की, तुम्हाला काही त्रास आहे का? त्यावर राऊत म्हणाले मला ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा व्हेंटिलेशन नाही. त्यावेळी कोर्ट ईडीला म्हणाले हे योग्य नाही. त्यानंतर ईडीने कोर्टाची माफी मागितली. तसेच, एसी रूममध्ये राऊत यांना राहायचे नसेल तर आमच्याकडे दुसऱ्या रुम आहेत. त्या ठिकाणी त्यांना ठेवता येईल.
हेही वाचा -Rahul Gandhi : राहुल गांधींचं मोदींना थेट चॅलेंज.. म्हणाले, 'काय करायचं ते करा, मी नरेंद्र मोदींना घाबरत नाही..'