मुंबई -गोव्याच्या जनतेचा जनाधार भारतीय जनता पक्षाच्या मागे असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस हे गोव्यामध्ये गेल्यानंतरच भारतीय जनता पक्ष फुटला. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री मायकल लोगो यांनी राजीनामा दिला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने देखील पक्ष सोडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत जे युद्ध सुरू आहे. त्या विरोधात लढाई करावी अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut criticized devendra fadnavis ) यांनी केली आहे. मुंबई आज ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे ( Sanjay Raut press conference ) वक्तव्य केले.
उत्तर प्रदेशला भेट देणार -
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना 50-100 जागा लढवणार आहे. मी उद्या पश्चिम उत्तर प्रदेशला भेट देणार आहे असे संजय राऊत यांनी ( sanjay raut visiting western Uttar Pradesh ) सांगितले आहे.
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाई नोटांशी -
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाईही नोटांशीचं आहे, निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गोव्यामध्ये नोटांनी भरलेल्या बॅगा पाठवल्या जात आहेत. त्या भरलेल्या नोटांच्या बॅगाशी शिवसेना लढणार असून गोव्याच्या जनतेने नोटांच्या दबावाखाली येऊ नये असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.