महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोंबडी पकडलेल्या वाघाचा फोटो टाकून राऊत यांचा निशाणा! - नारायण राणेंचे विधान

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोची आता चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर कोंबडी पकडलेल्या वाघाचा फोटो टाकला आहे. या फोटोतून राऊत यांनी कुणावर निशाणा साधला अशी चर्चा आता सोशल मीडियात रंगत आहे.

संजय राऊत यांची पोस्ट
संजय राऊत यांची पोस्ट

By

Published : Aug 25, 2021, 2:16 PM IST

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोची आता चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर कोंबडी पकडलेल्या वाघाचा फोटो टाकला आहे. या फोटोतून राऊत यांनी कुणावर निशाणा साधला अशी चर्चा आता सोशल मीडियात रंगत आहे.

संजय राऊत यांची पोस्ट

आजचा दिवस थोडक्यात!!!

जबड्यात कोंबडी पकडलेल्या वाघाचा फोटो राऊत यांनी फेसबूक आणि ट्विटरवरून शेअर केला आहे. या फोटोवर "आजचा दिवस थोडक्यात!!!" असे लिहिले आहे. या फोटोच्या माध्यमातून राऊत यांनी राणेंवर निशाणा साधल्याची चर्चा सोशल मीडियात रंगत आहे. दरम्यान, त्यांनी टाकलेला हा फोटो सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय ठरत आहे.

कोंबडी चोर लिहिलेले बॅनर

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या विधानानंतर मंगळवारी राज्यभरात शिवसैनिकांनी राणेंविरोधात निदर्शने केली. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी कोंबडी घेऊन आंदोलन केले. तर मुंबईत नारायण राणेंच्या फोटोसह कोंबडी चोर असे लिहिलेले बॅनरही शिवसैनिकांनी लावले होते. त्यामुळे राऊत यांनी टाकलेला हा फोटो राणेंवर निशाणा असल्याचे सोशल मीडिया युझर्सचे म्हणणे आहे.

हेही वाचा -पोलीस संरक्षण काढा, राणेंचा घरात घुसून कोथळा बाहेर काढतो; आमदार संतोष बांगर यांचं वादग्रस्त वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details