महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोदींसाठी १८ हजार कोटींचे विमान, जनता मात्र भाव वाढीत होरपळी;राऊतांची 'रोखठोक' टीका - Sanjay raut

'मोदींनी देशभरात मोफत कोरोना लसीची पूर्तता केल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. असे उत्तर रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री या भाव वाढीवर देत आहेत. म्हणजे मोफत लसीकरणाचा भार शेवटी जनतेच्याच माथी मारला जात आहे. मग मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात? हा प्रश्न देशाला पडला आहे. असा रोखठोक प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या आपल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत

By

Published : Oct 31, 2021, 10:06 AM IST

मुंबई- रामेश्वर तेली हे पेट्रोलियम खात्याचे राज्यमंत्री आहेत. त्यांना पत्रकारांनी विचारले, 'साहेब, पेट्रोल-डिझेलमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे त्यावर काहीतरी करा?' यावर मंत्री महोदय काय सांगतात? 'मोदींनी देशभरात मोफत कोरोना लसीची पूर्तता केल्याने पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. म्हणजे मोफत लसीकरणाचा भार शेवटी जनतेच्याच माथी मारला जात आहे. मग मोफत लसीकरणाची जाहिरात कोणाच्या पैशाने आणि का करीत आहात? हा प्रश्न देशाला पडला आहे. असा रोखठोक प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या आपल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून उपस्थित केला आहे.

जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका

'सण साजरे करावे असे वातावरण आज खरेच आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. आज 'महागाईचा भडका उत्सवांचा उत्साह जाळून टाकीत आहे. त्या आगीत सत्ताधाऱ्यांच्या जळजळीत वक्तव्यांची भर पडत आहे. महागाई टोकाची आहे. ती कमी करता येत नसेल तर होरपळणाऱ्या जनतेच्या जखमांवर मीठ तरी चोळू नका असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला आहे.

जे हिंदुस्थानी रुपयांत 59 रुपये होतात

पेट्रोल दरवाढीवर सत्ताधारी भाजप मखलाशी करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. सत्ताधारी भाजपचा युक्तीवाद असा की, 'महाराष्ट्रात किंवा देशात पेट्रोलने शंभरी पार केली म्हणून का रडता? पाकिस्तानातही पेट्रोल 137 रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, ही वकिली करणाऱ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, हे '137' पाकिस्तानी रुपयांत आहेत. जे हिंदुस्थानी रुपयांत 59 रुपये होतात. हिंदुस्थानात पेट्रोलचे भाव दिल्लीत 106 रुपये आणि मुंबईत 115 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यावर कुणी बोलत नाही व सगळेच राजकीय पक्ष मुंबईच्या समुद्रातील क्रुझ पार्टीत अडकून पडलेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

'जनतेचे दिवाळे - राज्यकर्त्या पक्षाची दिवाळी'

लसीकरणावर खर्च केल्यामुळे इंधन दरवाढ होत असल्याचे मोदी सरकारमधील मंत्री म्हणाले आहेत. त्याचा समाचार राऊतांनी घेतला आहे. 'संपूर्ण देशातील लसीकरणाचा खर्च 67,113 कोटी इतका दाखवला आहे. पण मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलवर 'कर' लावून 25 लाख कोटींची वसुली आजपर्यंत केली आहे. पुन्हा कोविडशी मुकाबला करण्यासाठी 'पीएम केअर फंड' हे बिगर सरकारी खाते उघडून त्यात उद्योगपती, सरकारी उपक्रम यांच्या माध्यमातून लाखो-कोटी रुपये जमा केले ते वेगळेच. जनतेचे दिवाळे निघत आहे व राज्यकर्त्या पक्षाची ही अशी दिवाळी जोरात सुरू आहे.' असा टोला त्यांनी भाजप आणि मोदी सरकारला लगावला आहे.

'पंतप्रधानांचे नवे निवासस्थान जनतेवर लादलेल्या महागाईच्या ओझ्यातून'

पंतप्रधानांसाठी १८ हजार कोटींचे खासगी विमान खरेदी केले जाणार आहे. दुसरीकडे सामान्य जनतेला गॅस सिलिंडर विकत घेणे परवडत नसल्यामुळे त्यांनी सिलिंडर भंगारात काढले आहे. 'माचीस महागण्याशी, खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल भाववाढीशी या 18 हजार कोटींच्या खासगी विमान खरेदीचा संबंध जोडू नये. पंतप्रधानांच्या सोयीसाठी असे एक विमान असणे ही गरज आहे. पण माचीस, तेल, नोकऱ्या, पगार ही लोकांची 'चैन' झाली आहे, त्याचे काय? दिल्लीत 20 लाख कोटी रुपये खर्च करून 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्प हट्टाने उभा केला जात आहे. त्यासाठी दिल्लीची आन-बान-शान धुळीस व खड्डय़ांत मिळवली आहे. संपूर्ण नवी दिल्लीचे रूपांतर खोदकामात झाले. नवी संसद, नवी कार्यालये, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान हे सर्व जनतेवर लादलेल्या महागाईच्या ओझ्यातून उभे राहणार असेल, तर काय करायचे? संतापाच्या भरात काही पेटवायचे म्हटले तर माचीसची काडीही महाग झाली. तरीही दिवाळी येतच आहे. ती साजरी करूया, दिवे पेटवूया. त्या प्रकाशातच नवा मार्ग शोधता येईल असही ते यामध्ये म्हणाले आहेत.

हेही वाचा -ड्रग्ज प्रकरणाचे षडयंत्र रचून भाजपने महाराष्ट्राला बदनाम केले -नाना पटोले

ABOUT THE AUTHOR

...view details