संजय राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद
महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई; संजय राऊतांचे वकील
प्रवीण राऊत हे व्यावसायिक
कोठडी द्यायची असेल तर कमी वेळेची द्या
राऊतांकडे आलेले पैसे हे कायदेशिररित्या
15:39 August 01
संजय राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद
संजय राऊतांच्या वकिलांचा युक्तिवाद
महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई; संजय राऊतांचे वकील
प्रवीण राऊत हे व्यावसायिक
कोठडी द्यायची असेल तर कमी वेळेची द्या
राऊतांकडे आलेले पैसे हे कायदेशिररित्या
15:24 August 01
ईडीचा युक्तिवाद
2010-11 मध्ये संजय राऊत यांना 2 लाख रुपये प्रत्येक महिन्याला प्रवीण राऊत यांच्या कडून मिळाले
काही परदेशी टूर साठी प्रवीण राऊत यांनी संजय राऊत यांना आर्थिक पुरवठा केला
ईडीने संजय राऊत यांची 8 दिवसांची कोठडीची मागणी
ईडीच्या वकिलाचा युक्तिवाद संपला
14:50 August 01
संजय राऊत यांना घेऊन ईडी अधिकारी सत्र न्यायालयात दाखल
संजय राऊत यांना घेऊन ईडी अधिकारी सत्र न्यायालयात दाखल
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सत्र न्यायालयात करण्यात आले हजर
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात
ईडी कडून राऊत यांची कोठडी मागण्याची शक्यता
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग करणार युक्तिवाद
14:25 August 01
संजय राऊत यांना ईडी अधिकारी सत्र न्यायालयात घेऊन दाखल
संजय राऊत यांना ईडी अधिकारी सत्र न्यायालयात घेऊन दाखल
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात संजय राऊत यांना अटक केल्यानंतर सत्र न्यायालयात करण्यात आले हजार
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात न्यायाधीश देशपांडे यांच्यासमोर थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात
ईडी कडून राऊत यांची कोठडी मागण्याची शक्यता
ईडीच्या वतीने सॉलिसिटर जनरल अनिल सिंग करणारी युक्तिवाद
संजय राऊत यांना ईडी अधिकाऱ्यांनी जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचणीनंतर कोर्टात केले हजर
13:17 August 01
उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या कुटुंबाची घेणार भेट
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे थोड्याच वेळात शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रविंद्र वायकर उपस्थित रहाणार आहेत.*
12:55 August 01
ईडी संजय राऊत यांना घेऊन जेजे रुग्णालयाकडे रावना
ईडी संजय राऊत यांना घेऊन जेजे रुग्णालयाकडे रावना
मेडिकल केल्यानंतर न्यायालयत केले जाणार हजर
12:54 August 01
राऊतांना घेऊन ईडीचं पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना; वैद्यकीय तपासणी होणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात ईडीने रविवारी रात्री अटक केली. दरम्यान, आज त्यांना घेऊन ईडीचे पथक जे.जे रुग्णालयाकडे रवाना झालं आहे. राऊत यांची जे.जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. कदाचित तपासणी झाल्यानंतर राऊत यांना थेट न्यायालयात नेलं जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जेल की बेल हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.
12:54 August 01
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट
राऊत कुटुंबावर संकट असल्याने धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे भांडुप येथील घरी जाणार आहेत
11:55 August 01
खोटे प्रकरण तयार करून संजय राऊतांना अटक, हे सर्व भाजपचे कारस्थान - सुनील राऊत यांचा आरोप
पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
10:47 August 01
Sanjay Raut Arrest update and live : संजय राऊत यांना ईडी अधिकारी सत्र न्यायालयात घेऊन दाखल
शिवसेनेचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर रात्री ईडीनं (ED) अटक केली. तब्बल 17 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयात राऊत यांना रात्री 12: 30 सुमारास अटक करण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने ही कारवाई केली आहे. आज सकाळी वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना ईडीच्या कोर्टात हजर केले जाणार आहे. काल सकाळीच ईडीचे पथक संजय राऊतांच्या घरी दाखल झाले होते. या पथकाने दिवसभर घरामध्ये राऊतांची चौकशी आणि छापेमारी केली. यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांनी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणले आहे. या कार्यालयात सुमारे साडेसात तास राऊतांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली.
काल सकाळी 7 वाजेपासून नेमकं काय घडलं....
रविवारी सकाळी 7 वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल
सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल. यावेळी संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते.
सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले.
सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे 4 ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांनी केले.
सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रिया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया.
सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले.
सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले.
सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.
सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली.
दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले.
दुपारी साडेतीन वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची ईडीकडून तयारी
दुपारी 3.50 वाजाता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले.
दुपारी 4 .10 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन त्यांच्या निवास्थानाबाहेर पडले.
दुपारी 4. 20 वाजता ईडीचं पथक संजय राऊतांना घेऊन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले,यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली.
संजय राऊतांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेल्याची 4.30 वाजता बंधू सुनील राऊत यांची माहिती
ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतल्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलने केली.
आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही!, संजय राऊतांचे पाच वाजता ट्वीट
मरेन पण, झुकणार नाही; संजय राऊत, साडे पाच वाजता संजय राऊतांचा माध्यमांसोबत संवाद
ईडीच्या छापेमारीत राऊत यांच्या घरातून साडे सहा वाजता 11.50 लाख रुपये जप्त
संध्याकाळी पावणे अकरा वाजता व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल
ईडीचे अतिरिक्त संचालक सत्यव्रत कुमार रात्री पावणे बारा वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचले.
रात्री 11.38 मिनिटांनी संजय राऊत यांना ईडीकडून अटक
आज काय होणार -
संजय राऊत यांना ईडीकडून अटक झाली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. संजय राऊत यांना सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
राऊतांच्या अटकेवर राणा म्हणतात...-शिवसेनेला भाजपच्या युतीतून बाहेर काढून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महायुती केली. या सर्वांमागे संजय राऊत हेच कारणीभूत असून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांनी फायनान्शिअल डील केली असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रवी राणा यांनी यावेळी केले आहे.
जो जसे करेल त्याला तसे भरावेच लागेल, रामदास कदम - ते म्हणाले की, विधीचे विधान आहे, जो जसे करतो, तसेच त्याला भरावे लागते. काॅग्रेस, राष्ट्रवादीच्या नादी लागून त्यांनी हिंदुत्व सोडले. आता या वेळेला यांच्या उपयोगाला कोणी आले का? आता त्यांना हिंदुत्वाचा भगवा गमछा शेवटीला मिरवतात. मद, मस्ती, अहंकार यांचा उपयोग करून कोणी सत्तेचा दुरुपयोग करीत असेल, तर त्यांना तसे भरावे लागेल. शिवसेना नेत्यांचा अहंकार वारंवार त्यांच्या भाषेतून दिसून येत होता.
१० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव : पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने रविवारी सकाळी सात वाजता धडक कारवाईला सुरुवात केली. नऊ तासानंतर राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी आणले. त्यानंतर राऊत यांना अटक केली. ईडीने दिवसभर केलेल्या झाडाझडतीत सुमारे ११ लाख ५० हजारांची रोख रक्कम सापडली. त्यापैकी १० लाखांच्या बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असल्याचे ईडीच्या निदर्शनास आले. संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी याबाबत खुलासा केला.