मुंबई - गुढीपाडव्याच्या निमित्ताने झालेल्या मनसेच्या पाडवा मेळातील राज ठाकरे यांच्या भाषणाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेचे वादळ कुठ शांत बोतय ना होतय तोपर्यंतच रविवारी रात्री भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय खळबळ उडालेली आहे. (Nitin Gadkari Meet With Raj Thackeray) ही कौटुंबीक भेट असल्याचे गडकरी यांनी सांगितले असले तरी येणाऱ्या राजकीय समिकरणांची नांदी ठरवणरी ही भेट असणार अशीच सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मनसे नेत्याचं स्पष्टीकरण - यासंदर्भात आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'अद्याप तरी भाजप मनसे युतीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे' देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. (MNS-BJP Alliance Discussion ) पण, सोबतच त्यांनी भविष्यात काय होईल हे माहीत नाही असही म्हटले आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या सांगण्यातही संधिग्दता आहे. त्यामुळे या चर्चेने चांगलीच उचल खालली आहे.