महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MNS Hanuman Chalisa : संदीप देशपांडे, संतोष धुरींची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव

4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर सुरू ( Shivteerth Raj Thackeray Residence Mumbai ) असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांना चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता. तेव्हापासून हे दोन्ही नेते फरार आहे. या दोन्ही नेत्यांनी आज ( सोमवारी ) मुंबई सत्र न्यायालयात ( pre-arrest bail Mumbai Sessions Court ) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी ( Sandeep Deshpande and Santosh Dhuri ) हे ज्या कारमधून पळून गेले होते. ती कार ज्या ड्रायव्हरने चालवली होती त्याला आणि दादर शाखाप्रमुख संतोष साळी यांना पोलिसांनी अटक केली होती.

By

Published : May 9, 2022, 7:19 PM IST

Sandeep Deshpande and Santosh Dhuri
Sandeep Deshpande and Santosh Dhuri

मुंबई -मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी आज (सोमवारी) मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. 4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर सुरू ( Shivteerth Raj Thackeray Residence Mumbai ) असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांना चकवून दोन्ही नेत्यांनी पळ काढला होता. तेव्हापासून हे दोन्ही नेते फरार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी ( Sandeep Deshpande and Santosh Dhuri ) हे ज्या कारमधून पळून गेले होते. ती कार ज्या ड्रायव्हरने चालवली होती त्याला आणि दादर शाखाप्रमुख संतोष साळी यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवले आहेत.


मुंबई पोलिसांकडून 7 पथक तयार करण्यात आले असून या पथकाद्वारे संदीप देशपांडे यांचा शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या 4 टीम केल्या तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुंबई क्राईम ब्राँचच्या 3 टीम देखील मनसेच्या दोन्ही नेत्यांचा शोध घेत आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस मुंबई, पनवेल, नवी मुंबई, उरण, खोपोली या ठिकाणी शोध घेत आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरही या दोघांचा शोध असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेदरम्यान मशिदीपुढे भोंग्यांवरून आक्रमक भूमिका घेत सरकारला 3 मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी 4 मे रोजी पहाटेपासून मशिदीसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून मनसेच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या.

हेही वाचा -Ed's action : श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details