मुंबई - 'बेस्ट'च्या विषयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी मनसे नेत्यांनी वेळ मागितला होता. मात्र, त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आम्हाला वेळ न देता त्यांच्याच संघटनेच्या बेस्ट कामगारांना वेळ दिला आणि त्यांनी त्याच दिवशी निवेदन दिले. दुसऱ्याला श्रेय मिळू नये इतका छोटा विचार मुख्यमंत्री म्हणून ते करत असतील तर, ते चुकीचे आहे, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मुख्यमंत्र्यांनी छोट्या विचारात अडकू नये - संदीप देशपांडे - News about Uddhav Thackeray
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी छोट्या विचारात अडकू नये.
मनसे नेते योगेश चिले यांनी संदीप देशपांडे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून शिवसेनेच्या छोट्या मेंदूचा मोठा खुलासा, अशी टीका केली होती. त्यावर संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाखो लोकांच्या साक्षीने त्यांनी कोणविषयी ममत्व ठेवणार नाही, अशी शपथ घेतली होती. त्यामुळे आता असे वागणे चुकीचे आहे. आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. छोट्या गोष्टीत अडकलेत तर कठीण आहे. महाविकासआघाडी म्हणजे तीन पायाची शर्यत आहे. खाते वाटपाच्या विस्ताराची कधी बाँड्री पार होईल, हे देवाला माहीत, अशी टीका देखील नेते संदीप देशपांडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर केली.