मुंबई -राज्यातील ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी पार पडला. मात्र अद्याप खातेवाटप झालेले नाही. मागील तीन दिवस झाले चर्चा होत आहे, तरी अद्याप खाते वाटपाचा तिढा सुटला नाही. यावरून मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यात खाते वाटप होत आहे की, कसे खाता येईल याचे वाटप होत आहे, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला आहे.
संदीप देशपांडे यांची खातेवाटपावरून सरकारवर टीका.... हेही वाचा... नूतन मंत्र्यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; पाहा काय म्हणाले मंत्री मुश्रीफ, सतेज पाटील
'खात्यांचा खेळ चाले'
महाराष्ट्र राज्यातील हे पहिले सरकार आहे. ज्यांनी खातेवाटपाआधी बंगल्याचे वाटप केले. यावरूनही मनसेने देखील टीका केली आहे. खाते वाटपापूर्वी मंत्र्यांना बंगल्यात राहण्याची चिंता जास्ती आहे की, काय असे दिसत असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. इतके दिवस खात्यांचे वाटप होत नव्हते. मात्र खाते वाटपापूर्वी बंगले वाटप केले आहेत. खाते वाटपावरून सध्याची लोकप्रिय मालिका 'खात्यांचा खेळ चाले' सुरू असल्याचा टोलाही देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून सरकारला लगावला आहे.
हेही वाचा... सावित्रीबाईंना शेण, दगड मारले होते; पण १८४८ साली त्यांच्या पहिल्याच शाळेत होत्या ४५ मुली